Mugdha chitnis biography graphic organizer



'दृष्ट लागण्या जोगे सारे..' या गाण्यातील 'ती' सुंदर मराठमोळी अभिनेत्री आठवतेय का? गंभीर अजाराने झाला मृत्यू

मुंबई, 8 ऑगस्ट - मनोरंजन विश्वात अशा अनेक नायिका आहेत ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच रसिकांवर मोहिनी घातली. पहिल्याच सिनेमातून त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

पण कालांतराने त्या सिनेविश्वापासून दुरावल्या. कोणी लग्न केलं, तर कोणी लग्नानंतर परदेशी स्थायिक झाल्या तर कोणी आपला स्वत:चा व्यवसाय सुरु केला. प्रत्येक अभिनेत्रीची एक वेगळी स्टोरी आहे. काही अभिनेत्रींनी तर फारच लहान वयात या जगाचा निरोपही घेतला. मराठी मनोरंजन विश्वात अशी एक अभिनेत्री होती जी एका गाण्यामुळं प्रचंड लोकप्रिय झाली. पण ही अभिनेत्री अचानक मनोरंजन विश्वातून गायब झाली, ही अभिनत्री कोण आणि ती का गायब झाली याबद्दल आपण जाणून घेणार आहे.

मराठीतले हॅण्डसम हंक अभिनेते अजिंक्य देव याचं ‘दृष्ट लागण्या जोगे सारे …’हे लोकप्रिय गाणं आजही लोकांना पुन्हा पुन्हा पाहवं वाटतं.

या गाण्यातील आणि ‘माझं घर माझा संसार ‘या सिनेमातील ही गोड अभिनेत्री आजही सर्वांच्या लक्षात आहे. खांद्यापर्यंत केसांची स्टाईल आणि गालावर पडणारी खळी यामुळे ही नायिका रसिकांना त्या काळी खुपच भावली. या सुंदर अभिनेत्रीचं नाव मुग्धा चिटणीस असं होतं. पण या एका सिनेमा नंतर ही मराठमोळी अभिनेत्री अचानक कुठे गेली असा प्रश्न सर्वांना पडतो.

वाचा- 37 कोटी बजेट, Cardinal कोटीपेक्षा जास्त कमाई ; पहिल्यांदा माय-लेकी दिसल्या एकत्र
मुग्धा चिटणीस यांनी वयाच्या 21 व्या वर्षी तिने हा सिनेमा केलेला.

तिच्या आयुष्यातला एकमेव मराठी सिनेमा होता हा. मुग्धा चिटणीस ही अगदीच माहिती नव्हती अस कधीच नव्हतं. ती नावाजलेली कथा कथनकार होती. भारतासोबत अमेरिकेत तिने 500 हून अधिक कार्यक्रम सादर केले होते. ऑल इंडिया रेडिओवरून तिचे कार्यक्रम प्रक्षेपित झाले होते. 18 फेब्रुवारी 1965 साली जन्मलेल्या मुग्धा चिटणीसने वयाच्या 21 व्या वर्षी अजिंक्य देव सोबत माझा घर माझा संसार हा सिनेमा केला होता.

त्या काळात देखील सुपरहीट असणार गाणं कायमस्वरूपी हिटच राहिलं. तिचे लग्न उमेश घोडके यांच्यासोबत झालं.
मुग्धा चिटणीस यांनी वयाच्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अकाली मृत्यू झाल्याने ती पुन्हा कधीच दिसली नाही. कॅन्सरसारख्या आजाराने तिचा अकाली मृत्यू झाला. 5 डिसेंबर 1994 रोजी कॅन्सरचे निदान झाले आणि अवघ्या दोन वर्षातच म्हणजे 10 एप्रिल 1996 साली तिने जगाचा निरोप घेतला.

तीने जगाचा निरोप घेतला तेव्हा तिला पाच वर्षांची एक मुलगी होती. त्यामुळे उमेश घोडके यांनी यांनी तिचा काही वर्षे सांभाळ केला. त्यानंतर तिला आपल्या आजी-आजोबांकडे पाठवले. पुढे ती वडिलांसोबत अमेरिकेत गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Tags: Marathi Entertainment News

  • First Publicized :